संग्रहित छायाचित्र |
पुणे : बाळहिरडा खरेदीविषयी व्यापक आंदोलनाची तयारी करत असून आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये लोकप्रतिनिधींना ही निवेदन दिले जाणार असल्याची माहिती किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष ॲड.नाथा शिंगाडे यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील, आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यातील आदिवासी भागातील नागरिकांचे मुख्य उत्पनाचे साधन असलेल्या, बाळहिरडा या गौण वनउपजाची खरेदी वर्षानुवर्षे आदिवासी विकास महामंडळ करत असे. परंतु मागील तीन ते चार वर्षांपासून आदिवासी विकास महामंडळ यांनी बाळहिरडा खरेदी करणे थांबवले आहे. त्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांनी बाळ हिरड्याचे भाव पाडले असून प्रचंड मोठे आदिवासी बांधवांचे शोषण यातून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, किसान सभेने 30 मे, पासून बेमुदत धरणे आंदोलन, घोडेगाव येथील प्रकल्प कार्यालयासमोर सुरू केले होते.
अहमदनगर : बाळ हिरडा खरेदी प्रश्नी राजूर येथे किसान सभेचा मोर्चा
या आंदोलनावेळी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, राहुल पाटील, प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ यांनी संवाद साधला होता. व हिरडा खरेदी प्रश्नावर, आदिवासी विकास महामंडळ, नाशिक येथे व्यवस्थापकीय संचालक यांच्या समवेत दि.1 जून 2022 रोजी बैठक आयोजित करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते.
त्यानुसार दि. 1 जून 2022 रोजी नाशिक येथे आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सिंगला यांच्यासमवेत किसान सभेच्या शिष्टमंडळाची अत्यंत सकारात्मक बैठक पार पडली. या बैठकीत किसान सभेने तीन मुख्य मागण्या केल्या होत्या.
ब्रेकिंग : माळशेज घाटात दरीत उडी मारून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
आदिवासी भागात उत्पादित होणारा बाळहिरडा महामंडळाने त्वरित खरेदी सुरू करावा. व त्यास रास्त दर द्यावा. बाळहिरडा उत्पादक शेतकरी यांचे हीत लक्षात घेऊन, दीर्घकालीन बाळहिड्याचे धोरण निश्चित करण्यासाठी एक अभ्यास समिती नेमावी. निसर्ग चक्रीवादळात झालेली बाळहिरड्याची नुकसान भरपाई मिळावी. वरील मागण्याविषयी संघटनेच्या शिष्टमंडळानी सविस्तर वास्तव व अभ्यासपूर्ण भूमिका मव्यवस्थापकीय संचालक यांच्यासमोर मांडली.
किसान सभेने बाळहिरड्याची खरेदी करण्याविषयक विविध संदर्भयुक्त सविस्तर भूमिका मांडणारे निवेदन व्यवस्थापकीय संचालक यांना सादर केले आहे. यावर निर्णय घेण्याकरिता आदिवासी विकास मंत्री व प्रधान सचिव,आदिवासी विकास विभाग, यांच्यासमवेत संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक मंत्रालय येथे घेण्यासाठीची वेळ प्रशासनाने मागितली आहे. ही बैठक लवकरच व्हावी अशी किसान सभेची मागणी आहे.
पुणे जिल्ह्यातील, आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यातील आदिवासी भागातील जनतेचा, बाळहिरडा खरेदी व त्याचा रास्तदर हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या तीनही तालुक्यातील लोकप्रतिनिधी म्हणजेच, तालुक्याचे आमदार व या भागाचे खासदार यांना सदरील प्रश्नाबाबतचे सविस्तर निवेदन किसान सभेच्या वतीने दिले जाणार आहे. या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या सकारात्मक हस्तक्षेपाची बांधिलकी या निवेदनात नमूद केली जाणार आहे.
पुणे येथे 10 वी आणि 12 वी पास करू शकता अर्ज, BRO मध्ये 876 जागांसाठी भरती
आदिवासी विकास मंत्री यांच्या पुढाकाराने हा प्रश्न सुटावा अशी किसान सभेची अपेक्षा आहे, पण हा प्रश्न शासनाने रेंगाळत ठेवल्यास किसान सभेच्या वतीने व्यापक जनआंदोलन पुढील काळात उभे केले जाणार असल्याचा निर्धार नुकत्याच किसान सभेच्या जिल्हास्तरीय online पद्धतीने पार पडलेल्या बैठकीदरम्यान करण्यात आला आहे.
या बैठकीला किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष ॲड.नाथा शिंगाडे, किसान सभेचे जिल्हा सचिव डॉ.अमोल वाघमारे, महेंद्र थोरात, विश्वनाथ निगळे, अशोक पेकारी, राजू घोडे, लक्ष्मण जोशी, अमोद गरुड, विकास भाईक, संतोष कांबळे, दत्तात्रय बर्डे इ.उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 288 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी