Saturday, October 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडजिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र औंध पुणे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर यांना सन्मानपत्र

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र औंध पुणे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर यांना सन्मानपत्र

पिंपरी चिंचवड : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवच्या  निमित्ताने जिल्हा परिषद पुणे यांच्यातर्फे विजय कान्हेकर यांना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे जिल्हा परिषदेचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते `सन्मानपत्र´ देण्यात आले.

विजय कान्हेकर यांनी दिव्यांगासाठी शीघ्र निदान व उपचार, डे केअर सेंटर, मल्टी थेरपी सेंटर, सेंसरी गार्डन, इत्यादी सुविधा उभारून देशपातळीवरील प्रशिक्षण केंद्र तयार करणे, जिल्ह्यातील विविध प्रशासकीय विभाग, दिव्यांग लाभार्थी व संबंधित विभाग यांच्यातील एक दुवा म्हणून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्यात आली.

या केंद्राद्वारे एकवीस प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण पुनर्वसनाच्या दृष्टीने जनजागृती सर्वेक्षण, जलद निदान सल्ला व मार्गदर्शन, कृत्रिम अवयव व साधने पुरवठा, शस्त्रक्रिया, दाखला देणे तसेच विशेष शिक्षण व प्रशिक्षण देण्याचे कार्य पार पाडले जाते.

महाराष्ट्रातील दिव्यांग चळवळीतील एक सामाजिक कार्यकर्त्याचा हा सन्मान केल्याबद्दल विजय कान्हेकर सरांचे महाराष्ट्रातून कौतुक होत आहे.

    

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय