Friday, November 22, 2024
HomeनोकरीMPSC Exam : एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर

MPSC Exam : एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर

MPSC Exam 2024 : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने (Maharashtra Public Service Commission) 2024 मध्ये विविध पदांसाठी हाेणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षेची जाहिरात, पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा तसेच निकाल केव्हा जाहीर हाेणार? याबाबत अंदाजित तारखा दिल्या आहेत. MPSC Bharti 

त्यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवेची पूर्वपरीक्षा 28 एप्रिल राेजी हाेणार आहे. या परीक्षेची जाहिरात जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध केली जाईल. पूर्व परीक्षेचा निकाल जुलै महिन्यात जाहीर हाेणार असून 14, 15 आणि 16 डिसेंबर राेजी मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे.

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पदांसाठी पूर्वपरीक्षा दि. 17 मार्च तर 27 जुलै राेजी मुख्य परीक्षा हाेणार आहे. अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 16 जून राेजी हाेणार आहे. त्यानंतर गट- ब (सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पाेलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक) मुख्य परीक्षा 29 सप्टेंबर राेजी हाेईल. सहायक माेटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 26 ऑक्टाेबर राेजी तसेच गट- क (कर सहायक दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उद्याेग निरीक्षक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहायक, विमा संचालनालय ) परीक्षा 17 नाेव्हेंबर राेजी पार पडणार आहे.

अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा ( सहायक आयुक्त अन्न गट- अ आणि अन्न सुरक्षा अधिकारी गट- ब ) 9 नाेव्हेंबर राेजी तर महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 10 नाेव्हेंबर, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य या तिन्ही परीक्षा 23 नाेव्हेंबर राेजी हाेणार आहे. निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा 1 डिसेंबर राेजी हाेणार आहे. तसेच महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 28 आणि 29 डिसेंबर राेजी हाेईल असे जाहीर करण्यात आले आहे.

अंदाजित वेळापत्रक; बदल होऊ शकतो!

परीक्षांचे वेळापत्रक अंदाजित असून जाहिरात आणि परीक्षेचा प्रस्तावित महिना आणि तारखेत बदल हाेऊ शकताे. झालेला बदल आयाेगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच परीक्षा याेजना, अभ्यासक्रम, निवड पध्दत इत्यादीचा तपशील आयाेगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा : 28 एप्रिल

राज्यसेवा मुख्य परीक्षा : 14, 15 आणि 16 डिसेंबर

संयुक्त पूर्व परीक्षा : 16 जून

गट ब मुख्य परीक्षा : 29 सप्टेंबर

गट क मुख्य परीक्षा : 17 नाेव्हेंबर

संबंधित लेख

लोकप्रिय