Friday, September 20, 2024
Homeताज्या बातम्याMaharashtra Bandh : उद्या महाराष्ट्र बंद ; ‘या’ सेवा राहणार बंद

Maharashtra Bandh : उद्या महाराष्ट्र बंद ; ‘या’ सेवा राहणार बंद

Maharashtra Bandh : बदलापूर येथील ४ आणि ६ वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. संतप्त नागरिकांकडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

महाविकास आघाडीने केलेल्या आवाहनानुसार, राज्यातील सर्व शाळा, कॉलेज, मुलांचे पालक, दुकानदार, यांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे. या बंदच्या माध्यमातून महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा बंद राहणार आहेत. दूध, भाजीपाला मार्केट, किराणा दुकाने, तसेच हॉटेल्स सुद्धा बंद असण्याची शक्यता आहे.

उद्या, २४ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाविकास आघाडीतर्फे आयोजित या बंदमध्ये एसटी बस, लोकल, आणि अन्य सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलकांनी काही दिवसांपूर्वी रेल्वे रोको आंदोलन केले होते, त्यामुळे मुंबई लोकल सेवेवर याचा परिणाम होऊ शकतो.

Maharashtra Bandh

उद्धव ठाकरे यांनी या बंदसाठी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले असून, हिंसाचार टाळण्याची विनंती केली आहे. सरकार अकार्यक्षम असलं तरी जनतेला सक्षम व्हावे लागते, असा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

बदलापूर प्रकरणातील आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे. “आम्ही लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नाही, पण सुरक्षित बहीण महत्त्वाची आहे,” असे ठाकरे यांनी नमूद केले.

या महाराष्ट्र बंदमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील दळणवळण आणि जनजीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. महाविकास आघाडीकडून आयोजित या बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक : बदलापुरनंतर कोल्हापूरमध्ये दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून

MPSC : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या आंदोलनास यश

मोठी बातमी : दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार

सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय