Loksabha result : आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. देशभरातील विविध मतमोजणी केंद्रांवर ही प्रक्रिया सुरू झाली असून संपुर्ण देशाच्या नजरा या निकालांकडे लागल्या आहेत. देशात पुन्हा भाजप सत्तेत येणार कि इंडिया आघाडी परिवर्तन करणार हे पहावे लागणार आहे. (Loksabha result)
मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत आहे. निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांची देखरेख आहे.
प्राथमिक निकालानुसार काही ठिकाणी सत्ताधारी भाजप पक्ष आघाडीवर आहे, तर काही ठिकाणी विरोधी पक्षांनी जोरदार कामगिरी केली आहे. प्रादेशिक पक्षांचादेखील महत्त्वाचा प्रभाव दिसून येत आहे. काही ठिकाणी त्यांनी आघाडी घेतली आहे.
सत्ताधारी पक्षाचे प्रमुख नेते आणि विरोधी पक्षाचे नेते यांच्या मतदारसंघातील निकालांवर विशेष लक्ष केंद्रित आहे. काही प्रमुख नेते आघाडीवर असून, त्यांच्या विजयी होण्याची शक्यता अधिक आहे.
सकाळी 9 वाजता देशात एनडीए ३१६ तर इंडिया १८६ जागांवर आगाडीवर आहेत. महाराष्ट्रात पाहिले तर एकुण ४८ जागांपैकी महायुती २३ आणि महाविकास आघाडी २६ तर इतर १ अशा जागांवर आघाडीवर आहे.
हेही वाचा :
‘गाढवाचं लग्न’ मधील लोककलावंत प्रभा शिवणेकर यांचे निधन
HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती
मत्स्यव्यवसाय विभागात भरती, पगार 2 लाखांपर्यत
सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
दुचाकीत साडीचा पदर अडकून पुण्यातील महिलेचा मृत्यु
नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन
एसटी महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी
संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले