अलाहाबाद :अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवार, 1 सप्टेंबर रोजी लिव्ह-इन रिलेशनशिपवर सुनावणी करताना जनावरप्रमाणे प्रत्येक ऋतूत जोडीदार बदलण्याची संकल्पना सुसंस्कृत आणि निरोगी समाजाचे लक्षण असू शकत नाही, असे म्हटले आहे. लग्नात जी सुरक्षितता, सामाजिक मान्यता आणि स्थिरता मिळते ती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये कधीच मिळू शकत नाही.
सहारनपूरचा रहिवासी असलेल्या अदनानवर त्याच्या लिव्ह-इन पार्टनरने बलात्काराचा आरोप केला होता. दोघेही वर्षभर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले आणि याच दरम्यान मुलगी गरोदर राहिली. याबाबत न्यायमूर्ती म्हणाले की, देशातील विवाह संस्था नष्ट करण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत.
अनेक तथाकथित देशांप्रमाणे आपणही त्या मार्गावर जात आहोत, जिथे भविष्यात आपल्यासाठी मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. देशातील विवाह संस्था नष्ट करण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत. लिव्ह इन मधून जन्माला आलेल्या मुलांना समाजात मोठया समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यांचे पालक विभक्त झाल्यावर ती मुले समाजात ओझे ठरतात,लग्नाच्या नात्यात सुरक्षा असते, ती लिव्ह इन मध्ये नसते.
---Advertisement---
---Advertisement---
लग्नाच्या नात्यात जी सुरक्षा असते, ती लिव्ह-इनमध्ये नसते – अलाहाबाद हायकोर्ट
---Advertisement---
- Advertisement -