Wednesday, February 5, 2025

तोक्ते चक्री वादळात सांबरखल, साबरदरा जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले ; जीवितहानी टळली

सुरगाणा (दौलत चौधरी) : तोक्ते चक्रीवादळाचा जिल्हा परिषद शाळा सांबरखल, साबरदरा या शाळेला जोरदार तडाखा बसला. सांबरखल येथील चार वर्ग खोल्यांची पत्रे जोरदार आलेल्या वादळात उडाली असून पत्र्यांचा अगदीच चेंदामेंदा झाला आहे. हेच पत्रे समोरील एक वर्ग खोली असलेल्या कौलारू इमारत व मंदिरावर पडल्याने कौलाचे नुकसान झाले आहे. तर साबरदरा येथील बारा वाजेच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळात दोन वर्ग खोल्यांचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन गावित, सरपंच गंगाराम वाघमारे, संपत मोरे, पांडुरंग देशमुख  सांबरखलचे अध्यक्ष नरेंद्र राऊत, पोलीस पाटील मनोहर भोये, सरपंच विलास घाटाळ, ज्ञानेश्वर खंबायत, जालिंदर कामडी, जयराम छगणे, रोहीत खंबायत, हंसराज चौधरी यांनी नैसर्गिक आपत्ती  विभागाने तात्काळ पंचनामा करावा अशी मागणी केली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles