Thursday, August 11, 2022
Homeचक्रीवादळाने आदिवासी भागात घरावरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान

चक्रीवादळाने आदिवासी भागात घरावरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान

spot_imgspot_imgspot_imgspot_img

सुरगाणा (दौलत चौधरी) : एकीकडे कोरोनाने आदिवासी भागात हातपाय पसरले तर दुसरीकडे  तोक्ते चक्रीवादळाने अतोनात नुकसान झाल्याने  आदिवासी बांधव संकटात सापडला आहे. अंलंगुण येथील नाईकपाडा येथे सोन्या गांगोडे यांच्या इंदिरा  आवास घरकुल योजनेच्या घरावरील पुर्ण सिंमेटी पत्रे जोरदार वादळाने उडाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

केवळ मोलमजुरी करुन पिंपळगाव भागात द्राक्षे बागावर मजुरीला जाऊन कसेतरी  डोक्यावर छप्पर उभे केले होते. तेच वादळाने उडवून  घेतल्याने डोक्यावरीलच छत्र हरवून घेतल्याने चिंता वाढली आहे. छपर टाकण्या करीता पैसे कोठून आणणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. तर करंजाळी जवळील चिल्हारपाडा येथील धनाजी चौधरी यांच्या घरावरील पत्र्याचे छत वादळाने पुर्ण उडून गेल्याने सुमारे एक लाख दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. डोळ्या देखत घरावरील पत्रे उडाल्याने जीव मुठीत  धरून शेजारी घरात आसरा घेण्याची वेळ आली आहे. त्यातच सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने धान्य तसेच संसारोपयोगी वस्तू भिजण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे माणी येथील शेतकरी  प्रभाकर महाले यांच्या शेतातील घरावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. 

साबरदरा येथील गोविंद ठाकरे यांच्या घरावरील पुर्ण  छपर उडाल्याने घरातील धान्य इतरत्र हलविण्याची वेळ आली आहे. देवलदरी येथील मनोहर पवार यांच्या घरावरील छपराचे अतोनात नुकसान झाले आहे. उंबरठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील पत्रे उडाल्याने वैद्यकीय अधिकारी तसेच परिचारिका यांना जीव मुठीत धरून बाहेर पडावे लागले. काहीजन टेबला खाली लपल्याने मोठा अनर्थ  टळला. दैव बल्वतर म्हणून वाचलेत. तर पळसन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती वरील लोखंडी पत्रे उडाल्याने खुप मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्ती विभागाने तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहे.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय