Wednesday, December 4, 2024
Homeराजकारणलाठ्या खाऊ तुरुंगात जाऊ पण... संजय राऊत यांचे ट्वीट चर्चेत

लाठ्या खाऊ तुरुंगात जाऊ पण… संजय राऊत यांचे ट्वीट चर्चेत

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षात अखेर उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर उध्दव ठाकरे यांनी फेसबुकवरून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनाम्याची घोषणा केली. या सोबतच विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेले ट्वीट सध्या चांगलेच चर्चेत आहे. संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे की, मुख्यमंत्री अत्यंत gracefully पायउतार झाले. आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला आहे. दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील जिंकले. शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ. तुरुंगात जाऊ. पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ ! असे राऊत यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या ट्वीट मध्ये म्हटले आहे की, न्याय देवता का सन्मान होगा ! फायर टेस्ट fire test अग्नीपरिक्षा की घडी हैं. ये दीन भी निकल जाएंगे. असे म्हटले आहे. या ट्वीट सोबत त्यांनी डेमोक्रॉसीचा फोटो सोबत जोडलेला आहे, त्यात न्यायपालिका हा लोकशाहीचा स्तंभ खाली पडल्याचे दाखवलेले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय