Wednesday, February 5, 2025

आशा वर्कर्सच्या ज्या मागण्या योग्य आहेत, त्या मागण्या मान्य करु – आरोग्यमंत्री राजेश टोपे

पुणे, दि. १५ : आशा वर्कर्सच्या ज्या मागण्या योग्य आहेत, त्या मागण्या मान्य करु असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना टोपे म्हणाले, “आशा वर्करबाबत माझी कृतीसमितीसोबत सविस्तर चर्चा झाली आहे. त्यांच्या ज्या एकदोन मागण्या योग्य असतील त्या मान्य करु. त्यामुळे आंदोलनाचा प्रश्न उद्भवत नसल्याचेही ते म्हणाले.

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीआधी राजेश टोपेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला .


Related Articles

- Advertisement -

Latest Articles