मुंबई : सध्या राज्यातील राजकारणात नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकार देखील अल्पमतात आहे. उद्या ठाकरे सरकारची बहुमत चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना देखील वेग आल्याचे बघायला मिळत आहे. अशात आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना उरणमधून आलेल्या पत्रातून अश्लील शिवीगाळासह त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका बंद लिफाफ्यातून पेडणेकर यांना हे पत्र आल्याची माहिती आहे. या पत्रात ‘सरकार पडू दे नाहीतर तूला मारू’ अशा स्वरूपाची धमकी देण्यात आली आहे. या पत्रामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच किशोरी पेडणेकर यांच्या फोटोवर क्रोस करण्यात आले आहे.
हे पत्र निळ्या पेनाने लिहले असून अत्यंत गलिच्छ भाषा वापरत या पत्रातून पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.