Ladki Bahin Yojana : राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे नुकतेच संपन्न झाले. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी महत्वाची घोषणा केली. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याची खात्री देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी डिसेंबर महिन्याच्या रकमेबाबत महत्त्वाची माहिती दिली. हिवाळी अधिवेशनानंतर डिसेंबरचे पैसे थेट नवीन वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजेच जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी योजनेतील रकमेचे प्रमाण 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीनंतर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आले असल्याने, सरकार दिलेला शब्द पाळेल का, याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ 2 कोटींहून अधिक महिलांनी घेतला आहे. जुलै ते नोव्हेंबरपर्यंतच्या 5 महिन्यांचे एकूण 7500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता महिलांना डिसेंबरच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे काही निकष निश्चित करण्यात आले आहेत.
- 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्या अपात्र ठरतील.
- महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन असल्यास लाभ मिळणार नाही.
- कुटुंबातील सदस्य शासकीय किंवा कंत्राटी नोकरीत असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
- कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार/खासदार असल्यास योजनेस अपात्र.
- संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर शासकीय आर्थिक लाभ घेत असलेल्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही.
- ज्या महिला किंवा त्यांचे कुटुंबीय कर भरतात, त्या महिलांना लाभ मिळणार नाही.
योजनेतील लाभाची रक्कम वाढवून महिलांना 2100 रुपये देण्याचे निवडणुकीपूर्वीचे आश्वासन आता प्रत्यक्षात येईल का, याची प्रतीक्षा आहे. सरकारकडून याबाबत निर्णय झाल्यास महिलांची संक्रांत गोड होणार, यात शंका नाही.
Ladki Bahin Yojana


हे ही वाचा :
प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण
गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ
मुंबईत ठाकरे बंधू एकत्र : राज आणि उद्धव ठाकरे यांची भेट चर्चेला उधान
ब्रेकिंग : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन, फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले
ब्रेकिंग : शरद पवार यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात
BMC : बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
RITES लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती, आजच अर्ज करा
ब्रेकिंग : राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेट घेणार