कामगार नेते काशिनाथ नखाते यांचे कामगार संपर्क अभियान
नांदेड : नांदेड, लातूर, औरंगाबाद, धाराशिवसह मराठवाड्यातील कष्टकरी कामगारांत विविध कौशल्य पारंगत आहेत. कामगारांकडे गुणवत्ता आहे. मात्र विभागवार कामाची उपलब्धता करून देण्यात सरकार अपयशी ठरलेले असून मराठवाड्यातील कष्टकरी कामगाराना किमान व समान वेतन, कामाची हमी असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित लढू या. अशी साद कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज नांदेड लातूर जिल्हा दौऱ्यात केली. LATUR NEWS
नांदेड आणि लातूर जिल्हा येथे विविध ठिकाणी कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे कामगार संपर्क अभियानात बैठकांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी नांदेड जिल्हा अध्यक्ष परमेश्वर मठपती, लातूर जिल्हा अध्यक्ष गोपाळ वाडीकर, प्रदेश संघटक विनोद गवई, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, नायगाव तालुका अध्यक्ष अशोक टोकलवाड, देगलूर तालुका अध्यक्ष पंढरी भोईवाड, यादवराव चोपडे, निमंत्रक लक्ष्मण टोकलवाड, मेरसाब शेख, संतोष कुडके, वजीर शेख, संजय तळणे नागोराव टोकलवाड यांचे सह विविध तालुका प्रतिनिधी उपस्थित राहिले.
सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत नांदेड शहर, नरसी, खानापूर, देगलूर, लातूरशहर,निलंगा, औसा येथे बैठकीचे सत्र घेण्यात आले. विविध ठिकाणी नखाते यांचे कामगारांनी स्वागत केले.LATUR NEWS
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले की, मराठवाड्यातील MARATHWADA कामगारांचे स्थलांतर रोखण्यासाठी व विभाग वार कामाची उपलब्धता करून देणे सरकारचे काम आहे, मनरेगा MGNREGA सारख्या योजनाला सरकारने खिळ घातलेली असून या योजनेस निधी देणे बंद केले आहे, त्यामुळे कामे कमी झालेली आहेत. मराठवाड्यातील रिक्षाचालक, वाहनचालक, घरेलू कामगार, बांधकाम कामगार, फेरीवाला, कंत्राटी कामगार यांना एकत्र करून ही लढाई ताकतीने पुढे नेण्याचा निश्चयही यावेळी करण्यात आला.
नांदेड जिल्हा अध्यक्ष मठपती म्हणाले की आज कामगारांना संरक्षणाची गरज आहे, काम केल्यानंतर हे त्याच्या वेतनासाठी अनेक वेळा चकरा मारावे लागतात, तर अनेक ठिकाणी पैसे बुडवले जातात किमान वेतन मिळणे गरजेचे आहे.
प्रस्तावना उपाध्यक्ष राजेश माने, यांनी केले तर आभार मिरसाब शेख यांनी मानले.
---Advertisement---
---Advertisement---
Nanded : मराठवाड्यात कामगारांच्या हक्कासाठी लढू – काशिनाथ नखाते
---Advertisement---
- Advertisement -