कोल्हापूर : महागाई, बेरोजगारी विरोधात डाव्या आघाडीच्या वतीने बिंदू चौक, कोल्हापूर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कोल्हापूर शहर सचिव विवेकानंद गोडसे, राजेश वरक, शंकर काटाळे, विजय धनावडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिलीप पवार, सतिशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, अनिल चव्हाण, दिलदार मुजावर तसेच शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
आयडीबीआय बँकेत तब्बल 1544 जागांसाठी मेगा भरती
• आंदोलनातील मागण्या पुढीलप्रमाणे :
1. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करा, आशा गटप्रवर्तकना आरोग्य कर्मचारी म्हणून सेवेत कायम करा.
2. किमान वेतन कायद्यानुसार दरमहा आशाना 22 हजार व गटप्रवर्तकाना 24 हजार रुपये वेतन सुरू करा.
3. कामगार विरोधी चार श्रम संहिता त्वरित मागे घ्या.
4. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाचा कायदा करा.
5. पेट्रोल, डिझेल, गॅस सह गगनाला भिडलेली महागाई कमी करा.
6. देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून बेरोजगारी कमी करा.
7. नवीन शैक्षणिक धोरण 2020 मागे घ्या.
8. सार्वजनिक मालमत्तेची विक्री खाजगीकरण त्वरित थांबवा.
9. राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी धर्मांध शक्तींना आवर घाला.
व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज आता एडिटही करता येणार, काय आहे खासियत वाचा !
सीमा रस्ते संघटन (BRO) मध्ये 876 जागांसाठी भरती, पुणे येथे 10 वी, 12 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज !