Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Kolhapur : राधानगरीत भीषण अपघात ; ट्रक आणि बोलेरोच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात झालेल्या एका भयानक अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. सरवडे येथे ट्रक आणि बोलेरो गाडीच्या भीषण धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात निपाणी-देवगड राज्य महामार्गावर सरवडे-मांगेवाडी दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास घडला.

---Advertisement---

मिळालेल्या माहितीनुसार, 11 सप्टेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ एका बुलेरो गाडीला ट्रकनं धडक दिली अपघातात सोळंकूर गावातील शुभम धावरे (28), आकाश परीट (23) आणि रोहन लोहार (24) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच ऋत्विक पाटील, भरत पाटील, सौरभ तेली आणि संभाजी लोहार हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Kolhapur

अपघातानंतर अज्ञात ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे सोळंकूर गावात गणेशोत्सवाच्या आनंदावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles