Friday, March 14, 2025

खेड : मंदोशी येथील जावळेवाडी रस्त्याची दुरावस्था, नागरिकांची व्यथा प्रशासनाला समजणार का ?

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिरगाव व मंदोशी ग्रामपंचायत अंतर्गत असलेली जावळे वाडी येथील वस्तीवर येणारा रस्ता गेल्या वर्षी पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने खचून गेला आहे. या रस्त्याची खूप बिकट अवस्था झाली आहे. ही आदिवासी वस्ती असून, या वस्ती मध्ये 40 कुटुंब राहतात.

या वस्तीकडे जायचे म्हटले तर रस्ताच नाहीये. गाडी दूर लावून 2 कि.मी. पायी ये – जा करावी लागते. याकडे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे इलेक्शन असले की, गोड गोड बोलून आश्वासने देऊन जातात. परंतु एकदा निवडून आले की लोकप्रतिनिधी फिरकूनही बघत नाही, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पुणे : मजुरांना त्यांचा हक्क द्या, अन्यथा कायदेशीर लढाईसाठी तयार व्हा – किसान सभेचा जुन्नर प्रशासनाला इशारा

मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत

हा रस्ता होऊन अनेक दशके उलटून गेली अजून नवीन स्वरूपात रस्ता झालेला नाही, असे ग्रामस्थ सांगतात. दुरावस्था झालेल्या रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यात आपल्या शाळेला मुकावे लागत होते. आता सुद्धाही हीच परिस्थिती येथे आहे.

कोणी आजारी व्यक्ती असेल तर गावातून शहरी भागात घेऊन जायचे असले तर या रस्त्यामुळे हे शक्य नाही. त्यामुळे येथील ग्रामपंचायतने त्वरित या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा व नव्याने रस्ता बनून द्यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहे.

10 वी पास 12 वी पासांना खुशखबर..! नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३०७ जागा

आजही डोंगर दऱ्यात राहणाऱा आदिवासी समाज विकासापासून कैकपटीने दूर आहे. आदिवासी भागातील पाण्याची आणि पायाभूत सुविधांची वानवा कधी थांबणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles