एलन मस्क : पुढील वर्षी मानवी मेंदूत बसवणार चिप
वॉशिंग्टन : ‘टेस्ला’ आणि ‘स्पेस एक्स’सारख्या दिग्गज कंपन्यांचे प्रमुख एलन मस्क यांच्या वैज्ञानिक कल्पनाही भन्नाटच असतात. मंगळावर मानवी वसाहत स्थापन करण्याची स्वप्ने पाहणारा हा धडाडीचा उद्योजक आता पुढील वर्षीपासून एक अनोखा प्रयोग सुरू करणार आहे. आपली ब्रेन इंटरफेस कंपनी ‘न्यूरालिंक’ पुढील वर्षीपासून ब्रेन चिपच्या मानवी प्रयोगाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत
वॉलस्ट्रीट जर्नल’च्या वतीने आयोजित केलेल्या कौन्सिल समिटमध्ये ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी या नव्या प्रयोगाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की माकडांवरील हा मेंदूतील चिपचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. हीच सुरक्षित पद्धत असू शकते. आता मानवावर यशस्वी प्रयोग करण्यासाठी परवानगीची प्रतीक्षा आहे.
पाकिस्तानातील धुळीच्या वादळामुळे मुंबई पुणे मध्ये हवामान बदलले ?
अशी परवानगी मिळताच सर्वात आधी टेट्राप्लाजिक, क्वाड्रिप्लेजिक्स सारख्या मेरुरज्जूच्या समस्या असलेल्या लोकांना आधी त्याचा लाभ दिला जाईल. त्यातही गंभीर दुखापत असलेल्या लोकांना आधी ही चिप मिळेल. न्यूरालिंक कंपनीने हे न्यूरल इम्प्लांट म्हणजेच चेतासंस्थेत प्रत्यारोपित केले जाणारे उपकरण विकसित केले आहे. या चिपच्या कार्यप्रणालीसाठी बाह्य हार्डवेअरची गरज भासत नाही.
हेही वाचा ! एलियन्स समुद्रातून येत आहेत?
हेही वाचा ! कुत्रा बनला लेखक; मालकीण बनली लेखनिक!