Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC साई चौक येथील रोहीत्राची विद्युत सुरक्षा अबाधित ठेवा - अण्णा जोगदंड

PCMC साई चौक येथील रोहीत्राची विद्युत सुरक्षा अबाधित ठेवा – अण्णा जोगदंड

नव्या सांगवीतील विद्युत सुरक्षा ऐरणीवर

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर :
नव्या सांगवीतील साई चौकातील, श्रीनिवास सोसायटीच्या बाजूला रस्त्याच्या कडेला महावितरणने रोहित्र बसवले आहे,आणि कांकरीया गँसगोडावुन शेजारी असलेल्या रोहीत्राचे दरवाजे तुटलेले आहेत. गेल्या तीन- चार वर्षापासून नागरिक तुटलेले दरवाजे बसवून परिपूर्ण विद्युत सुरक्षेची मागणी करत आहेत, मात्र महावितरण याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड निवेदन देताना केला आहे. याबाबत त्यांनी सांगवी महावितरण अभियंता रत्नदीप काळे यांना निवेदन दिले आहे.



नागरिकांचा जीव गेल्यावरच महावितरणला जाग येईल का? असा संतप्त सवाल आण्णा जोगदंड यांनी केला आहे.नव्या सांगवीतील अत्यंत गर्दीच्या ठिकाणी हे रोहित्र असून समोरच भाजी मंडई पण आहे, आणि बस थाबा असल्याने रात्री मद्यपी मद्यप्राशन करून आतमध्ये बाटल्या ही टाकतात रोहीत्रासाठी बसवलेला दरवाच तुटलेला आहे आणि दिवस भर पावसाची संततधार चालू आहे त्यामुळे आधिकच धोकादायक वाटते. याची महावितरण ने त्वरित दखल घेऊन भविष्यात होणारी मानवी हानी आणि वित्तहानी होऊ नये म्हणून त्वरित रोहित्राला संरक्षक कुंपण व तटलेले दरवाजे बसवावेत आणि आतील निरूपयोगी डी.पी.पण काढावी. यामुळे रोहित्राच्या बाजूला कचराही कोणी टाकणार नाही. मद्यपी बाटल्या ही फेकणार नाहीत त्यामुळे होणारी दुर्घटना टळेल. असे अण्णा जोगदंड यांनी महावितरणच्या निदर्शनास आणून दिले आहे.


नागरिकही कचरा टाकून मोकळे होतात.


येताना जाताना आजूबाजूचे काही नागरिक त्या ठिकाणी कचराही टाकतात ,परवाच सोसायटीतील जागरूक नागरिक संजय चव्हाण यांनी आरोग्य विभागास कळवून रोहीत्राच्या आतील परिसर स्वच्छ करून घेतला. चव्हाण यांनी सांगितले की वारंवार फोन करूनही रोहित्राला एका बाजूने संरक्षक कुंपण बसवले जात नाही. त्या ठिकाणी मोकाट जनावर लहान मुले ही नेहमी जात असतात. त्यांच्या जिवाला ही धोका निर्माण झाला आहे.जर भविष्यात काही दुर्घटना घडली तर सर्वस्वी महावितरणच जबाबदार असेल असे जोगदंड यांनी  सांगवीतील अभियंते रत्नदिप काळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, महिला अध्यक्षा मीना करंजवणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, सचिव गजानन धाराशिवकर, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी यांच्या सहया आहेत.

लोणावळा व्हिडिओ : भुशी डॅम ओव्हरफ्लो – चला पर्यटन करू

कोट्यावधी रुपये खर्च करूनही पवना इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा

महाराष्ट्र : वैफल्यग्रस्त मोदी सरकारने केली लोकशाहीची निर्घृण हत्या

संबंधित लेख

लोकप्रिय