जुन्नर : अलदरे गावात जिल्हा परिषद निधीतून विविध विकास काम मंजूर केल्याबद्दल पिंपळगाव जोगा – डिंगोरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले यांचा सत्कार अलदरे ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या कार्यालयात पार पडला.
या भेटी दरम्यान गावातील विविध विषयांवर चर्चा झाली. विकास कामाचा आढावा घेऊन राहिलेली कामे लवकर मार्गी लावू असा शब्द दिला असल्याची माहिती युवा कार्यकर्ते दिपक सरजिने दिली. यात सरजिने यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी पोलीस पाटील सुमित लोहटे, ग्रामपंचायत सदस्य सागर दप्तरे, त्रिमूर्ती मंडळ अध्यक्ष देवराम दप्तरे, गजानन सरजिने, संदीप सरजिने, अनिल दप्तरे, रामकिसन सरजिने, पंकज सरजिने, हर्षल दप्तरे, आदित्य सरजिने उपस्थित होते.