Wednesday, February 12, 2025

उच्छिल केंद्र यांची दाऱ्याघाट येथे वर्षाविहार व परिसर सहलीचे आयोजन

जुन्नर / आनंद कांबळे) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल यांची निसर्ग सौंदर्यांनी नटलेल्या दाऱ्याघाटात सुंदर निसर्ग फुले व धबधबे आणि परिसर सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डामसेवाडी व भिवाडे बु. या शाळेतील मुलांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता.(Junnar)

यावेळी सर्व मुलांचे खेळ, गाणी व दाऱ्याघाट परिसरातील निसर्गाची व तेथील सौंदर्याची माहिती सुभाष मोहरे यांनी सांगताना आपल्या या घाटात खूप मोठ्या प्रमाणात असंख्य पर्यटक वर्षविहार करण्याच्या उद्देशाने येत असताना आपणही सातत्याने त्यांना जाताना- येताना पाहतो परंतु आपणही प्रत्यक्ष जाऊन याचा आनंद घ्यावा किंबहुना अनुभव घ्यावा म्हणून आपण दरवर्षी दसऱ्या नंतर या ठिकाणी येत असतो व येथील रानफुलांचा मनमोहक आनंद घेत असतो व आपल्या पुणे जिल्ह्यातील कासपठार असेही म्हटले तरी वागवे ठरणार नाही. सर्व मुलांनी खूप मनमोहक आनंद घेतला. नंतर सर्व मुलांना शिक्षकांच्या वतीने सुंदर वनभोजनाचे आयोजन केले होते याचा सर्वांनी आस्वाद घेतला.

यानिमित्ताने उच्छिल शाळेचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद, डामसेवाडीचे तुळशीराम साबळे व भिवाडे शाळेचे बाळासाहेब कडू यांच्यासह सर्व शाळांचे सहशिक्षक स्मिता ढोबळे, आरती मोहरे, लिलावती नांगरे, सिमा लोखंडे व आर्चना बटवाल यांच्यासह भिवाडे गावचे पोलिस पाटील व उच्छिल शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य संपत नवले शिवाजी नवले व हिराबाई नवले आणि विमलबाई करवंदे हे उपस्थित होते.

Junnar

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी : निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा

ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यात आज किंवा उद्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता

बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींना अटक, तर फरार आरोपीचा शोध सुरू

आनंदाची बातमी : होमगार्डसाठी राज्य सरकारने दिले दसऱ्याचे मोठे गिफ्ट

महायुती सरकार : महिलांसाठी महायुती सरकारची मोठी घोषणा

Related Articles

- Advertisement -

Latest Articles