Wednesday, February 5, 2025

जुन्नर : आदिवासी युवकांनी उद्योजकतेकडे वाटचाल करणे गरजेचे – अ‍ॅड. नाथा शिंगाडे

जुन्नर / शिवाजी लोखंडे : आदिवासी युवकांनी उद्योजकतेकडे वाटचाल करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन हिरडा फँक्टरी संचालक तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पुणे जिल्हा सचिव अ‍ॅडव्होकेट नाथा शिंगाडे यांनी केले. ते वनधन विकास केंद्राच्या बैठकीत जुन्नर येथे बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, बचतगटांच्या माध्यमातून माल खरेदी करुन सामुहिक पध्दतीने कार्यपध्दती राबवणे गरजेचे आहे. त्यातून सभासदांची उन्नती होणार आहे. गावात शेतमाल व इतर वनउपजांना योग्य भाव मिळेल, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेल शिंगाडे म्हणाले.

तसेच वनधन चालवताना नितीमत्ता, प्रामाणिकपणे चावलण्यासाठी नियमितपणे बैठका गरजेचे आहे. त्यातून  सभासदांना जागृत करून आदिवासी विकास साधण्यासाठी एकजूट होऊयात, असेही शिंगाडे म्हणाले.

यावेळी लक्ष्मण जोशी, गणपत घोडे, राजू शेळके, विलास डावखर, अक्षय रघतवान, अनिल ढेंगळे, भाऊ कारभळ आदीसह वनधन केंद्राचे सभासद उपस्थित होते.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles