Thursday, January 16, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडचिखली : राजे शिवाजीनगरमध्ये पाच तास बत्तीगुल, रात्रभर नागरिक घामाघूम

चिखली : राजे शिवाजीनगरमध्ये पाच तास बत्तीगुल, रात्रभर नागरिक घामाघूम

पिंपरी चिंचवड : चिखली प्राधिकरण पेठ क्र.१६, जाधववाडी, पंतनगर, कुदळवाडी परिसरात (दि.१९) रात्री १० वा बत्तीगुल झाल्यामुळे हजारो नागरिक घामाघूम झाले. अनेक सोसायट्यामधील पाणी पुरवठा सलग पाच तास वीज नसल्यामुळे बंद पडला. चिखली कुदळवाडीतील महावितरणच्या कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहेत.

मोशी येथील महावितरण कार्यालयाचा देखभाल आणि तांत्रिक विभागाचे येथील कामकाजामध्ये बिले वसूल करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम नाही. गेली १५ वर्षे या परिसरातील भूमिगत केबल बदललेल्या नाहीत. त्यामुळे त्या वारंवार जळतात. दुरुस्ती देखभालीसाठी कंत्राटी ठेकेदार संस्था नेमल्यामुळे तात्पुरते काम केले जाते, असा आरोप नागरिक करत आहेत.

मोशी येथील महावितरणचे ग्राहक संपर्क, तक्रार निवारण केंद्र बंद असते. या परिसरातील संपूर्ण वीज पुरवठा यंत्रणा दोषमुक्त आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महावितरणला नव्या कार्यक्षम अधिकाऱ्यांची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच काल (दि.१९) रात्री सलग पाच तास वीज नसल्यामुळे येथील इंटरनेट, वाय फाय, पाणी पुरवठा सेवा बंद पडली.

संबंधित लेख

लोकप्रिय