जुन्नर : नारायणगाव (ता.जुन्नर) येथील श्री संस्कार लक्ष्मी कॉर्नर सोसायटीत गजानन किसन गुंजाळ यांच्या फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून ३० हजार रुपये रोख व दोन तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार गजानन किसन गुंजाळ मेकॅनिक फिटर असून गुरुवारी (दि.७) सकाळी नेहमीप्रमाणे कामासाठी आपल्या दुकानात तर मुलगा आराध्य शाळेत निघून गेले होते. सकाळी ११.३० च्या सुमारास पत्नी शितल सोसायटीच्या तळमजल्यावर भिशीसाठी मैत्रिणीकडे गेल्या होत्या.
जुन्नर : विवाहितेने पतीलाच फसवले, प्रियकराच्या मदतीनं स्वतःचेच केलं अपहरण
त्यादरम्यान दोन अज्ञातांनी त्यांच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाट फोडून ३० हजार रुपये रोख व दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले. हे सर्व बारा वर्षाच्या एका मुलाने बघितले होते, परंतु त्यांच्या घरी चोरी होत असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. शिवाय नारायणगाव मध्ये लाईट नसल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. त्यामुळे चोरांना पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
चोरी झाल्याची बातमी दिनकर पाटे यांनी तात्काळ नारायणगाव पोलीस स्टेशन व सरपंच योगेश पाटे यांना कळवली. पुढील तपास नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे करीत आहे.
जुन्नर : घाटघर शाळेला पर्यावरण संवर्धन असोसिएशन च्या वतीने सौर वीज युनिट व लॅपटॉप संच
१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती
जुन्नर : पोषण पंधरवाडा अंतर्गत उदापूर येथे विविध कार्यक्रम संपन्न