Tuesday, September 17, 2024
Homeकृषीसोने झाले स्वस्त ,लिंबू महागले 20 रुपयाला एक लिंबू !

सोने झाले स्वस्त ,लिंबू महागले 20 रुपयाला एक लिंबू !

नवी दिल्ली : एरवी घरोघरी सहजपणे उपलब्ध असणार लिंबू आता दुर्मिळ वस्तू झाला आहे. लिंबू पाणी हे उन्हाळ्यात सामान्य माणसाचे थंड पेय मानले जाते.

मात्र आता लिंबूचे भाव गगनाला भिडल्याने साधे लिंबू पाणी हे श्रीमंतांचेच पेय बनले आहे. मागील काही दिवसात सर्वत्रच लिंबूच्या भावात प्रचंड वाढ होत तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. बुधवारी जयपूरमध्ये तर लिंबू सुमारे 400 रुपये किलो या भावाने विकले गेले. तर मंगळवारी जयपूरमध्ये लिंबाचा दर प्रति किलो 340 रुपये होता. तो बुधवारी 24 तासांत 60 रुपयांनी वाढला.

एका भाजी विक्रेत्याने सांगितले की, “लिंबूचे मर्यादित उत्पादन झाले आहे आणि त्यामुळे येथे लिंबाचा पुरवठा मर्यादित आहे. त्यातच डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने इतर राज्यांतून होणाऱ्या लिंबाच्या सामान्य पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे लिंबूच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे.” सध्या जयपूरमध्ये एक लिंबू 30 रुपयांना विकले जात आहे. मध्यमवर्गीयांसाठी ही प्रचंड अडचणीची बाब ठरते आहे. कारण बहुतांश सर्वसामान्य नागरिकांना दुपारी लिंबू पाणी पिण्याची सवय आहे. तापमान जेव्हा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाते तेव्हा लिंबू पाण्याचा मोठा आधार असतो.

काळजी घ्या ! महाराष्ट्रात पुढील काही दिवस तापमानात वाढ !

भाजी विक्रेते पुढे म्हणाले, “वाढत्या तापमानामुळे लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांपर्यंत लिंबाचा दर 140 ते 150 रुपये किलो होता. मात्र तो अचानक 220 ते 400 रुपये किलोपर्यंत पोचला आहे.” पारा चढल्याने लोकांनी लिंबाचा अधिक वापर करण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे त्यांच्या दरात मोठी झेप आहे. स्थानिक मंडईंमध्ये दुकानदार ३० रुपये किंमतीचे एक किंवा दोन लिंबू देत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून लिंबांची मागणी वाढली आहे.

कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये १७६ जागांसाठी भरती !

संबंधित लेख

लोकप्रिय