Wednesday, February 5, 2025

जुन्नर : DYFI राज्य सचिव प्रीती शेखर यांच्या अटकेचा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाकडून निषेध !

जुन्नर : डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) च्या राज्य सचिव प्रीती शेखर यांच्या अटकेचा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या जुन्नर तालुका समितीच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. या सबंधितचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, डी. वाय. एफ. आय. च्या प्रीती शेखर यांना आझाद मैदान पोलीसांनी एका २०१३ च्या जुन्या आंदोलनातील केसमध्ये आज (दि.१३) सायं ०४:३० वा त्यांच्या घरून अटक केली आहे. त्यांना सेशन कोर्टाकडून अद्याप जामीन मंजूर न झाल्याने आझाद मैदान पोलिस स्टेशन मध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. 

२०१३ साली DYFI व SFI ने शिक्षण व रोजगाराच्या हक्कासाठी मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. 

 

पुरोगामीत्वाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारणाऱ्या काँग्रेस – राष्ट्रवादी च्या हातात असलेले गृहखाते पोलिसांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या कॉम्रेड प्रिती शेखर सारख्या एका क्रांतिकारी आंदोलक युवतीला वारंवार अटक करत आहे आणि आंदोलनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, हे अत्यंत लज्जास्पद आहे. असेही एसएफआय ने म्हटले आहे.

निवेदन देतेवेळी एसएफआय राज्य कमिटी सदस्य संदिप मरभळ, जिल्हा उपाध्यक्ष राजू शेळके, तालुका अध्यक्ष अक्षय घोडे, तालुका सचिव प्रवीण गवारी उपस्थित होते.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles