जुन्नर : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील रूपा मोघा दिघे यांचा रायगड चे पालक मंत्री अनिल परब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
१५ स्वातंत्र्य दिनी रायगड जिल्ह्यातील मंडनगड या ठिकाणी गट विकास आधिकारी या पदावार कार्यरत असणारे शिरोली गावचे सुपुत्र रूपा मोघा दिघे यांचा शबरी व रमाई योजना तालुक्यात 100 % राबवून रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रायगड चे पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते महा आवास अभियान पुरस्कार 2020 – 21 जिल्हा स्तरीय परितोषकने सन्मानित करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जाखड, भा.प्र.से अधिकारी डॉ. पाटिल, पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग इत्यादी उपस्थित होते.
– संपादन : शिवाजी लोखंडे