(प्रतिनिधी):- गेली अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या आंबे-हातवीज घाटातील रस्त्याच्या कामाला अखेर सरपंच मुकुंद घोडे, आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर मुहूर्त मिळाला. जुन्नर तालुक्यातील आंबे, हातवीज, पिंपरवाड़ी, सुकाळवेढे आणि आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांना जोडनारा हा प्रमुख रस्ता आहे.
निकृष्ठ कामामुळे दरवर्षी पावसाळ्यात रस्ता वाहून जाणे दरड कोसळने,भूस्खलन होणे यामुळे या गावांचा तालुक्यापासुन संपर्क तूटतो. ऐन पावसाळ्यात कोणी आजारी पडल्यास दवाखाना देखील उपलब्ध होत नसे, परिणामी कोणतेही प्रशासकीय काम होत नसे, अनेक मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असे. त्यामुळे या सर्व गावातील ग्रामस्थानमधे प्रशासना विषयी तीव्र नाराजी होती.
ही समस्या सोडवण्यासाठी सरपंच मुकुंद घोडे यांनी सरपंच पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर तालुका प्रशासनाशी पत्रव्यवहार करुन ठेकेदारास अखेर 13 जून रोजी काम चालू करण्यास सुरुवात झाली आहे.