Wednesday, February 12, 2025

जुन्नर : बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरणी एकास अटक तर २० जणांवर गुन्हा दाखल

जुन्नर : अंजनावळे ता.जुन्नर येथे बंदोबस्त करत असणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील आरसीपी पथक क्रमांक २ मधील जुन्नर येथे नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यास जमावकडून धक्काबुक्की, शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. गावात तमाशाचा कार्यक्रम सुरू असताना सोमवार दि. ८ मे रोजी रात्री १.२४ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी तोफिक निसरोद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून २० जणांवर शासकीय कामात अडथळा आणणे व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील एका आरोपीस अटक करण्यात आली असल्याचे पोलीस उपनिरीक्षक पर्वते यांनी सांगितले.

सविस्तर वृत्त असे की, अंजनावळे येथे आदिवासी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर विविध कार्यक्रम झाले. रात्री तमाशा सुरू असताना स्टेजच्या डाव्या बाजूला काही मुले उठून गोंधळ करत होती. त्यांना खाली बसा असे समजावून सांगत असताना यातील एका मुलाने शेख यांची कॉलर पकडून खाली पाडून काठीने मारहाण केली. तेथे असलेल्या १५ ते २० जणांनी शिवीगाळ दमदाटी करत हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. दरम्यान बंदोबस्तास असणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांनी शेख यांनी सुटका केली. पोलीस पाटील गुणाबाई लांडे यांच्याकडून मारहाण करणाऱ्याच्या नावाची खात्री केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

पोलीस कर्मचारी तोफिक निसरोद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शंकर नामदेव डोळस ह्या मुख्य आरोपीसह घनश्याम उर्फ सगन लांडे, सुरज विरनक, तुषार लांडे, तुषार साबळे, संदीप घुटे, सचिन लांडे, गणपत घोटकर, बुधा वाळकोळी, युवराज वाळकोळी, वसंत लांडे, युवराज आढारी, निंबा मांगले, रोहित लांडे, रामदास लांडे, लालू इदे, अशोक लांडे, सागर घोटकर, किरण लांडे, कुणाल कोंदे सर्व रा.अजनावळे ता.जुन्नर यांचे विरुद्ध पोलीसांनी शासकीय कामात अडथळा आणणे व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Lic life insurance corporation

Related Articles

- Advertisement -

Latest Articles