ओतूर / महेश घोलप : जुन्नर तालुक्यातील माळशेज पट्ट्यातील असलेले पिंपळगाव-जोगा (ता.जुन्नर) येथील धरण जलाशयात मासेमारी करण्यासाठी उतरलेली बोट उलटून एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि.९ जून रोजी सायं. ५ वाजता घडली असून मृतदेह शोधण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन संघाला पाचारण करण्यात आले होते.
जुन्नर : साईश्रद्धा मंगल कार्यालयात पार पडला सहावा आंतर धर्मीय विवाह सोहळा
याबाबत सविस्तर वृत्त असे की पिंपळगाव-जोगा धरणाच्या जलाशयात सुभाष बिश्वास व मिलान बिश्वास हे दोघे मासेमारीसाठी आपल्या छोट्या बोटीने खोल पाण्यात गेले असता वाऱ्याचा मोठ्या तडाख्याने बोट उलटून दोघेही पाण्यात फेकले गेले व बुडू लागले मात्र सुभाष बिश्वास याला पोहता येत असल्याने तो पोहत काठावर सुखरूप पोहचला मात्र मिलान बिश्वास हा पोहण्यात अपयशी ठरला तो पाण्यात बुडाला त्याचा शोध घेण्यासाठी जुन्नर आपत्ती व्यवस्थापन संघाला पाचारण करण्यात आले मात्र रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.
राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी
दुसऱ्या दिवशी जुन्नर आपत्ती व्यवस्थापन संघाचे प्रशांत कबाडी, संकेत कबाडी, सुनिल शिंदे, रुपेश जगताप, आदित्य आचार्य, राजकुमार चव्हाण, संकेत बोंबले व अमोल जाधव यांनी अथक परिश्रम घेतले त्यानंतर तिसऱ्या दिवशी सायं.६ वाजता मिलान बिश्वास याचा मृतदेह शोधण्यात यश आले असून पुढील तपास ओतूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तळपाडे करत आहेत.
कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे 130 रिक्त जागांसाठी भरती, 50000 रुपये पगाराची नोकरीची सुवर्णसंधी