Monday, July 15, 2024
Homeराज्यब्रेकिंग : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची खासदारकी जाणार?

ब्रेकिंग : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची खासदारकी जाणार?

मुंबई : नुकत्याच चार राज्यात राज्यसभा निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रात देखील सहा जागांसाठी अनेक नाट्यमय घडामोडीत झाल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे ४ उमेदवार उभे होते, मात्र यात शिवसेनेचे संजय पवार यांच्या पराभवाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. तर भाजपचे 3 निवडून आले. अशात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सहा आमदारांची नावे उघड करत त्यांनी आपला विश्वासघात केल्याचं म्हटले होते. त्यावरून आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिल्लीचा रस्ता धरत राऊतांची राज्यसभेवरील खासदारकी रद्द करा अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करणार असल्याची माहिती दिली आहे.

ड्रग्ज प्रकरणी “या” प्रसिध्द बॉलीवूड अभिनेत्याच्या मुलाला अटक

किरीट सोमय्या यांनीन ट्वीट करत म्हटले आहे कि, मी आज दिल्लीला जाणार आहे. संजय राऊत यांच्या धमक्या देणार्‍या आमदारांची आणि भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांची निवडणूक रद्द करण्याची निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे. “संजय राऊत यांनी सहा आमदारांची नावे उघड केली आणि त्यांनी आपला विश्वासघात केल्याचं म्हटलं. शिवसेनेला दिलेल्या आश्वासनानुसार या मतं दिली नाहीत, असं राऊत म्हणाले. हे कायद्याच्या विरोधात असल्याचं सोमय्यांनी म्हटलंय. यासाठी कायदेशीर मार्गाने निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे, असं सोमय्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

केंद्र आणि राज्य सरकारचे आदिवासींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष – वृंदा करात

कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे 130 रिक्त जागांसाठी भरती, 50000 रुपये पगाराची नोकरीची सुवर्णसंधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय