Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

जुन्नर : गाव वस्तीत बिबट्याचा जनावरांवर हल्ला, 4 जनावरे हल्ल्यात ठार

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील खामगाव येथील शेतकरी व दुग्ध व्यावसायिक संदेश जाधव व खंडू जाधव यांच्या गोठ्यात काल (९ जुलै) रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्याने जनावरांवर हल्ला केला. यामध्ये ३ गाया व १ म्हैस मृत पावली. बिबट्याने १ जनावर ओढत नेले. गाव वस्तीत हा प्रकार घडल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले.

---Advertisement---

खामगावचे उपसरपंच अजिंक्य घोलप यांनी तात्काळ पाहणी करून स्थानिक वनविभाग व पशुवैद्यकीय दवाखानाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क करून या घटनेचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी या साठी विनंती केली आहे. या वेळी निलेश घोलप, सागर घोलप, अक्षय पठारे, बाबू जाधव इ.ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles