जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर नगरपालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी आज छत्रपती संभाजीराजे सभागृहात सोडत काढण्यात आली. यावेळी प्रांत सारंग कोडीलकर, मुख्याधिकारी मनोज पष्टे व विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अनुसुचित जमाती महिला व अनुसुचित जाती महिला हे आरक्षण पूर्वीप्रमाणे ठेवण्यात आले. नव्याने ओबीसी आरक्षण सोडत काढण्यात आली. २० जागेपैकी ५ जागा या प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले. ५ चिठ्ठ्या काढून या जागा निश्चित केल्या त्यापैकी ३ जागा ओबीसी महिला साठी राखीव ठेवण्यात आल्या.
जुन्नर नगरपालिका आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे :
प्रभाग १ : १ अ अनुसूचित जमाती महिला, १ ब – सर्वसाधारण
प्रभाग २ : १ अ -अनुसुचित जाती महिला, १ ब -सर्वसाधारण
प्रभाग ३ : १ अ – सर्वसाधारण महिला, १ ब- सर्वसाधारण
प्रभाग ४ : १ अ – नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला, १ ब – सर्वसाधारण
प्रभाग ५ : १ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग, १ ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग ६ : १ अ – सर्वसाधारण महिला, १ ब – सर्वसाधारण
प्रभाग ७ : १अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग, १ ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग ८ : १ अ – सर्वसाधारण महिला, १ ब – सर्वसाधारण
प्रभाग ९ : १ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, १ ब – सर्वसाधारण
प्रभाग १० : १ अ – नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला, १ ब – सर्वसाधारण
---Advertisement---
---Advertisement---
जुन्नर नगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर
---Advertisement---
- Advertisement -