Junnar : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वन्यप्राणी आणि मानवी संघर्ष सतत पाहायला मिळत आहे. यात मानवदेखील मृत्यूमुखी पडत आहेत. वन्यप्राण्याकडून होणाऱ्या हल्ल्यावर उपाययोजना म्हणून जुन्नरचे बिबटे गुजरातला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
अलिकडच्या काळात बिबट्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे बिबट्यांच्या आणि मानवावरील हल्ल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील बिबट्याच्या प्रश्न समोर आला होता. मात्र आता यावर उपाययोजना म्हणून वनविभागाने मोठा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये बिबट्याच्या वास्तव्यासाठी उपाययोजना तयार करण्यात आल्या असून जुन्नरचे बिबटे गुजरातच्या जामनगर येथील सेंट्रल झू मध्ये पाठविण्यात येणार आहे. त्यासाठीची केंद्राची देखील परवानगीही मिळाली आहे.
वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले कि, जुन्नर वन विभागात बिबट्याची वाढती संख्या व हल्ले वाढले असून मानव बिबट संघर्ष वाढला असल्याने वन विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जुन्नरमध्ये पकडलेले बिबट गुजरातच्या जामनगर येथील सेंट्रल झु मध्ये पाठवण्यात येणार आहेत.
Junnar
तसेच, माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे विस्तारिकरण करण्यात येणार आहे. आधीचे 40 आणि नवीन 60 बिबट्यांना या ठिकाणी हक्काचा निवारा मिळणार आहे. यासोबत AI अर्थात आर्टिफिशीयल इंटेलिजियन्सद्वारे लक्ष ठेवले जाईल. तसेच 150 नवीन पिंजरे, रेस्क्यू वाहने आणि व्याघ्र प्रकल्पाप्रमाणे स्पेशल प्रोटेक्षण फोर्स वाढवला जाणार आहे.
हेही वाचा :
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क
पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक
ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी
मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
ब्रेकिंग : अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट म्हणून ओळखले जाणारे, अभिनेता फिरोज खान यांचे निधन
ब्रेकिंग : आरोग्यसेवक, ग्रामसेवक परिक्षांचे वेळापत्रक जाहीर!
भारतीय सेना अंतर्गत ‘कमिशन्ड ऑफिसर’ पदांची भरती
विशेष लेख : भारतातील कोळशाने “या” उद्योगपतीचे केले हात काळे !!
भारतीय हवाई दल अंतर्गत 304 जागांसाठी भरती