Wednesday, February 5, 2025

जुन्नर : ग्रामपंचायत खटकाळे – खैरे येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा !

जुन्नर : ग्रुप ग्रामपंचायत खटकाळे – खैरे येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी लोकनियुक्त सरपंच शकुंतला मोरे यांनी उपस्थितांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देत शासकीय योजना समाजापर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

तर सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक नवनाथ मोरे म्हणाले, जागतिक आदिवासी दिन हा शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि मुलभूत सुविधांसाठीचा मागणी दिवस म्हणून साजरा केला पाहिजे. फक्त जय आदिवासी म्हणून प्रश्न सुटणार नाही, तर समाजाने प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचेही मोरे म्हणाले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते देवका मोरे, ग्रामसेवक साबळे भाऊसाहेब, पोलीस पाटील सुरेखा गागरे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मोरे, ग्राम रोजगार सेवक सचिन मोरे, विलास मोरे, विठ्ठल मोरे, चिंतामण मोरे, एकनाथ मोर, गोरक्षनाथ मोरे, रविंद्र मोरे, भागू बोऱ्हाडे आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles