Monday, June 24, 2024
Homeजुन्नरJunnar : विविध मागण्यासाठी माजी आमदार शरद सोनवणे यांचे जुन्नर तहसिल कार्यालयावर...

Junnar : विविध मागण्यासाठी माजी आमदार शरद सोनवणे यांचे जुन्नर तहसिल कार्यालयावर आंदोलन

Junnar /आनंद कांबळे : जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या एक महिन्यात बिबट हल्ल्यात ५ मानवाचे बळी गेले आहेत. शेतकऱ्यांचा आक्रोश मोठा आहे. प्रशासन कामासाठी मुजोर व हतबल आहे. आक्रोश करणाऱ्या पिडीत गावच्या शेतकऱ्यांवर अमानुषपणे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत यासाठी माजी आमदार शरद सोनवणे सह सर्वसामान्य जनतेचा निषेध व्यक्त करण्यासाठी तहसिल कार्यालय जुन्नर येथे (दि. २५ मे) रोजी सर्वपक्षीय पायी मोर्चा काढण्यात आला होता. (junnar)

जुन्नर मधील पाच रस्ता चौकापासून सुरू झालेल्या सुरू झालेल्या त्या मोर्चामध्ये माजी आमदार शरद सोनवणे, बाळासाहेब दांगट, अंबादास हांडे, मोहित ढमाले, विश्वास आमले, मधुकर काजळे, संतोष चव्हाण, अविनाश कर्डिले, दीपेश परदेशी, संतोष वाघ, निलेश चव्हाण, संतोष घोटणे, जमीर कागदी, अंबादास डोके, सुरेखा वेठेकर, संतोष वाजगे, सचिन थोरवे, मंगेश काकडे आदींसह धनगर समाज आपल्या मेंढरांसह सहभागी झालेले होते. तसेच शेतकरी बांधव शेतकरी बांधव आणि आणि पक्षीय राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. (junnar)

या मोर्चाच्या वतीने मागण्यांचे निवेदन तहसीलदार रवींद्र यांना सादर करण्यात आले या निवेदनात नमूद करण्यात आले की, ज्यामध्ये उपवनसंरक्षक अधिकारी अमोल सातपुते, यांना महाराष्ट्र शासनाने तातडीने निलंबित करावे. शासनाला २०१८/१९ माणिकडोह बिबट निवारा केंद्र जलसंपदाची जमिन वन विभागाने संपादीत करुन अधिकचे तिनशे (३००) बिबटे निवारा केंद्रात ठेवण्याबाबत पत्रव्यवहार केला होता त्याचा निर्णय तात्काळ करणे, जुत्रर, आंबेगाव, खेड, शिरुर हे चार तालुके संवेदनशील बिबटक्षेत्र घोषित करून शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज वीज देण्यासाठी कायमस्वरुपी निर्णय व्हावा, बिबट व मानव संघर्ष कमी करण्यासाठी पकडलेल्या सर्व बिबट्यांना अभयारण्यात पाठवून द्यावे.

तसेच उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. जुन्नर तालुक्यात बिबट हल्ल्यामध्ये मानव मृत्यूंच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. जुन्नरमध्ये १०० वनअधिकारी अर्थात मनुष्यबळ व ३०० पिंजरे ही सामुग्री जलद गतीने मिळण्यात यावी. धनगर समाज हा भटकणारा समाज आहे, यांच्या प्रत्येक धनगर वाड्यावर आवाजाची बंदूक देण्यात यावी. बिबट हल्ल्यात पिडीत झालेल्या पिंपरीपेंढार, पिंपळवंडी, उंब्रज, काळवाडी या गावातील शेतकऱ्यांवर वनखात्याने सुडबुद्धीने गुन्हे दाखल केले आहे ते तातडीने मागे घेण्यात यावे.

यावेळी भाषणात बोलताना ते पुढे म्हणाले वन्यजीव कायदा रद्द व्हावा त्याचप्रमाणे ग्रामपंचायत ठराव देखील महत्त्वाचा आहे. जनतेच्या तीव्र स्वरूपाच्या भावना समजून घेऊन वरिष्ठ पातळीवर तात्काळ या मागण्यांबाबत कार्यवाही व्हावी, या मोर्चाच्या भावना शासनापर्यंत कळविण्याचे आश्वासन निवेदन स्विकारीत तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी यावेळी दिले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक : पुणे अपघात प्रकरण ; वेदांतचे ब्लड टेस्ट रिपोर्ट बदलण्यासाठी लाखोंचा व्यवहार

हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी

आज दहावीचा निकाल, असा पहा निकाल !

12वी च्या पुरवणी परिक्षेसाठीचे अर्ज आजपासून भरता येणार!

दिल्ली बेबी केअर सेंटरला आग, 7 मुलांचा मृत्यू, अनेक जखमी

ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू

इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?

खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण

मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली

मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन

Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क

पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक

ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी

मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर

हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय