जुन्नर / आनंद कांबळे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी(तेजूर) येथे आमदार वल्लभशेठ बेनके विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आमदार अतुल बेनके यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले. Junnar : Book distribution to Thakarwadi District Primary School
यावेळी पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब देवाडे, भिवाडे बु.च्या सरपंच कमलताई शेळकंदे, तेजूरच्या सरपंच अनिताताई जाधव, माजी संरपच तथा ग्रामपंचायत सदस्य संजय गावडे, किसन जाधव, रविंद्र दुधवडे व शिक्षकवृंद उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या वतीने सर्वांचे अभिनंदन, स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक आ.का.मांडवे यांनी केले.
भाऊसाहेब देवाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्याशी सुसंवादही साधला. तानाजी तळपे व लक्ष्मण कुडेकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले तर सूत्रसंचलन सचिन नांगरे यांनी केले.