Wednesday, February 5, 2025

जुन्नर : भाजप पदाधिकाऱ्यांसह चौघांवर गुन्हा दाखल

जुन्नर / रवींद्र कोल्हे : शिवाजी चौक येथे आज (दि.१५) मिरवणुकी काढल्याप्रकरणी ‘कोरोना आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये भाजप पदाधिकाऱ्यांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरवणुकीसाठी कुठल्याही प्रकाराची परवानगी न घेतल्यामुळे तसेच मिरवणुकीत ना कोणाला मास्क, ना सामाजिक अंतर, ना सॅनिटायझर चा वापर या कारणास्तव नामदेव उर्फ अण्णा खैरे, विनायक जाधव, ओंकार गुलदगड तिघेही रा. नारायणगाव तर विशाल बाणखेले रा. मंचर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे पी.आय.व्ही.एस. देशपांडे यांनी दिली.

नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस फौजदार ढमाले, पोलीस हवालदार भोगाडे, पोलिस नाईक साबळे व पोलिस कॉस्टेबल जायभावे, नारायणगाव शहरात पेट्रोलिंग करीत असतांना शिवाजी चौक येथे ६० ते ७० लोक आणि काही महिला मिरवणूक काढली. यावेळी मिरवणूकित कोरोनाचे कोणतेही नियम पाळले गेले नाही.

पुढील तपास नारायणगाव पोलिस स्टेशनचे पी. आय. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार टाव्हरे करीत आहे.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles