जुन्नर / रफीक शेख : जुन्नर तालुका हा बिबट प्रवण क्षेत्र आहे. सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असून ऊसतोडणीमुळे बिबट सैरभैर झाले आहेत. असे असतानाच कबाडवाडी येथे शेतात ऊस तोडणी सुरू असतानाच बिबट्याची 4 पिल्ले आढळून आली आहेत.
सविस्तर वृत्त असे की, कबाडवाडी (ता.जुन्नर) येथील शेती संतोष किसन कबाडी यांचा शेतात ऊस कामगार ऊस तोडणी करत असताना बिबट्याची 4 पिल्ले आढळून आली. वनविभागाला कळविल्यानंतर वन अधिकारी नितीन विधाटे, वनरक्षक राठोड, रमेश खरमाळे, आदी दाखल झाले.
त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राचे डॉ. बंडगर, महेंद्र ढोरे व कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या पिल्लांना रेस्क्यू करून बिबट निवारा केंद्रात दाखल केले.
जुन्नर तालुकात विविध भागांत मानवनिर्मित वनवे सुरूच…कडक कारवाई करण्याची मागणी
जुन्नर : “अज्ञानातून ज्ञानाकडे” नेणारी गुढी उभारून विद्यार्थीनींनी केले पुस्तक वाचन
एअर इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ११८४ जागा !