Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मातंग समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारणे गरजेचे-रमेश बागवे

सकल मातंग समाजाची राज्यस्तरीय बैठक पुण्यात संपन्न

पुणे- मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे ,मातंग समाजाच्या विकासासाठी बार्टी च्या धर्तीवर आर्टी ची स्थापना करावी या मागण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येवून राज्यभर लढा उभारावे लागेल असे मत मातंग एकता आंदोलनाचे नेते ,माजी मंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केले .मातंग समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुण्यात राज्यव्यपी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते .
पुढे ते म्हणाले की , मातंग समाज सामाजिक,शैक्षनिक व सर्वच बाबतीत अजुनही मागे आहे त्यासाठी आता समाजाला एकजुठ दाखवावी लागेल राज्यातील समाजाने आता एकत्र येने गरजेचे असल्याचे सांगितले .
आमदार सुनील कांबळे यांनी आपण शासन स्तरावर समाजाच्या मागण्या पोहचवून न्याय देण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे सांगितले .महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण वर्गीकरण समितीचे सदस्य प्रा .मच्छिंद्र सकटे यांनी आपल्या मागण्याबाबत सविस्तर अहवाल करण्याचे काम लवकर पूर्ण होणार असल्याचे जाहीर केले .
झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते भगवान वैराट यांनी मातंग समाजाच्या विकासासाठी सर्व राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले .
या राज्यव्यापी बैठकीच्या अध्यक्षस्थानी क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती चे अध्यक्ष विजय डाकले होते .यावेळी आमदार सुनील कांबळे ,प्रा.मच्छिंद्र सकटे ,झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते भगवान वैराट ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे ,लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हतागाळे,माजी नागसेवक अविनाश बागवे ,माजी नगरसेवक शांतिलाल मिसाळ ,मारुती वाडेकर ,राम चव्हाण ,पंडित सूर्यवंशी ,अशोक लोखंडे आदि मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले .प्रस्तविक भास्कर नेटके यांनी केले .सूत्रसंचालन अनिल हतागळे तर आभार दयानंद अडागळे यांनी मानले .या बैठकीला राज्यातील ४० पक्ष संघटनाचे नेते व प्रणुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles