नवी दिल्ली (वर्षा चव्हाण) – सरकारच्या सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात शेती कामगार आणि ग्रामीण कामगारांसाठी किरकोळ महागाई दर सौम्य प्रमाणात कमी झाला आहे. डिसेंबर 2024 मध्ये हा दर अनुक्रमे 5.01% आणि 5.05% होता, जो जानेवारी 2025 मध्ये 4.61% आणि 4.73% वर आला आहे. (Inflation)
केंद्रीय कामगार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, जानेवारी महिन्यात सर्वसाधारण ग्राहक किंमत निर्देशांक – कृषी कामगार (CPI-AL) आणि ग्रामीण कामगार (CPI-RL) अनुक्रमे 4 आणि 3 अंकांनी घसरला आहे. जानेवारीमध्ये CPI-AL 1,316 अंकांवर आणि CPI-RL 1,328 अंकांवर पोहोचला, तर डिसेंबर 2024 मध्ये हा अनुक्रमे 1,320 आणि 1,331 होता.
जानेवारीमध्ये अनुक्रमे 4.61% आणि 4.73% आकडेवारी जाहीर (Inflation)
निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की जानेवारी 2025 साठी CPI-AL आणि CPI-RL आधारित वार्षिक महागाई दर अनुक्रमे 4.61% आणि 4.73% नोंदवला गेला, जो जानेवारी 2024 मध्ये अनुक्रमे 7.52% आणि 7.37% होता. (Inflation)
अन्न निर्देशांकातही घट झाली असून, CPI-AL साठी तो डिसेंबरमधील 1,262 वरून जानेवारीमध्ये 1,255 वर आला, तर CPI-RL साठी 1,269 वरून 1,261 वर घसरला आहे.

हे ही वाचा :
इन्फोसिस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; लवकरच होणार पगारवाढ
संतापजनक : स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरूणीवर बलात्काराची घटना, डेपोतील धक्कादायक गोष्टी समोर
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा
बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, अनेक वस्तू जप्त, १३ जण अटकेत
LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!