सुपर वासुकी ही भारतीय रेल्वेद्वारे धावणारी सर्वात लांब मालगाडी आहे. ही मालगाडी 22 जानेवारी 2021 रोजी भारतीय रेल्वेच्या ” दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) ” झोनच्या ” रायपूर” विभागाद्वारे चालवली गेली. मालगाड्यांचे पाच रेक एक युनिट म्हणून एकत्र करून ही ट्रेन तयार करण्यात आली. ‘सुपर वासुकी’: 295 वॅगन असलेल्या भारताच्या सर्वात लांब ट्रेनबद्दल 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत. (Indian railway)
भारतीय रेल्वेने स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘सुपर वासुकी’ ही भारतातील सर्वात लांब आणि जड मालगाडी चाचणीसाठी चालवली. या ट्रेनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘सुपर वासुकी’ बद्दल 5 महत्त्वाचे मुद्दे:
वासुकी हे हिंदू धर्मातील नागांचा राजे आहेत, समुद्र मंथनाच्या वेळी वासुकीचं मोलाचं योगदान दिले आहे. वासुकी हे भगवान शिवांच्या गळ्यात विराजमान आहेत. ही मालगाडीही वासूकी सारखी लांब असून शक्तीशाली आहे, त्यामुळे याला वासूकी असं नाव देण्यात आलंय.
3.5 किमी लांब मालगाडी –
295 वॅगन असलेल्या या गाडीने 27,000 टन कोळसा कोरबा (छत्तीसगड) ते राजनंदगाव (नागपूर) दरम्यान 15 ऑगस्ट 2022 रोजी वाहून नेला.
पाच रेक्सचा समावेश – या ट्रेनची रचना पाच स्वतंत्र मालगाड्या एकत्र करून करण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठी मालगाडी
रेल्वेच्या मते, ही आतापर्यंतची सर्वात लांब आणि जड मालगाडी असून तिला एका स्थानकातून पूर्णतः जाण्यास सुमारे चार मिनिटे लागतात.
वीज निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण योगदान – ‘सुपर वासुकी’ एका प्रवासात जेवढा कोळसा वाहून नेते, तो 3000 मेगावॅट क्षमतेच्या वीजनिर्मिती प्रकल्पाला 24 तास पुरेल. ही गाडी सध्याच्या मालगाड्यांपेक्षा तीन पट जास्त मालवाहतूक करू शकते (सध्याच्या 90 वॅगनच्या ट्रेनमध्ये साधारणतः 9,000 टन कोळसा असतो). (Indian railway)
भविष्यात अधिक वापर – रेल्वे प्रशासनाच्या मते, अशा प्रकारच्या गाड्या विशेषतः उन्हाळ्यात, वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाच्या टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि आपत्कालीन काळात मालवाहतुकीसाठी भारतीय रेल्वेने ही मालगाडी बनवली आहे.