कालबाह्य उत्पन्न मर्यादेमुळे गोरगरीब अन्नसुरक्षेपासून वंचित होत आहेत.
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:देशात महागाई वाढत आहे.मात्र आज प्राधान्य गटासाठी (पिवळे कार्डाधारक,केशरी कार्डधारक) शहरी आणि ग्रामीण अशी उत्पन्नाची विभागणी न करता दोन्ही ठिकाणी सरसकट एकच निकष लावून ही मर्यादा वाढवावी. ग्रामीण साठी 44 हजार व शहरासाठी 59 हजार उत्पन्न मर्यादा आहे.2013 पासून महागाई निर्देशांकाप्रमाणे या उत्पन्न मर्यादेत कोणतीही वाढ सरकारने केलेली नाही.
पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्राच्या औद्योगिक शहरात रोजन,कंत्राटी,अंगमेहनती,नाका मजूर,विधवा,परितक्त्या इ विविध गोर गरीब वंचित आर्थिक दुर्बल जनता बहुसंख्येने भाड्याच्या घरात राहून किमान जीवन जगत आहेत.शासकीय अधिकाऱ्यांनी अन्नसुरक्षा कायदा 2013 च्या पूर्ण अंमलबजावणीसाठी केशरी,पिवळ्या रेशनकार्ड कार्ड पात्रतेसाठी ही उत्पन्न मर्यादा किमान 1 लाख 50 हजार करावी,अशी मागणी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप असोसिएशन,पुणे ग्रामीणचे अध्यक्ष विक्रम छाजेड यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
केंद्र शासन व ध राज्य सरकारने 24 जून 2013 रोजी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्क माफीसाठी उत्पन्नाची कुटुंबाची मर्यादा 4.50 लाख वरून 6 लाख केलेली होती. केंद्र शासनाने 13 सप्टेंबर 2017 रोजीच्या आदेशान्वये ही उत्पन्नाची मयार्दा 6 लाख रुपयांवरून 8 लाख रुपये केली आहे.हाच निकष गोरगरिबांच्या अन्नसुरक्षेसाठी लावला व सरसकट उत्पन्न मर्यादा किमान 1 लाख 50 हजार केली तर पिंपरी चिंचवड शहरातील लाखो वंचिताना केशरी व पिवळे रेशन कार्ड मिळेल.शहरातील विविध वस्त्यांमध्ये हातावर पोट असलेल्या श्रमिक नागरिकाना केंद्र सरकारच्या गरीब कल्याण व निर्धारित अन्नधान्य पुरवठ्याचा फायदा घेता येईल,असे विक्रम छाजेड यांनी सांगितले. आहे.विधिमंडळ,संसदेमध्ये लोकप्रतिनिधींनी या मागणीसाठी सरकारकडे पाठपुरावा करून उत्पन्न मर्यादा वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.तसेच रेशन दुकानदारांना कमिशन वाढ सरकारने द्यावी.असे विक्रम छाजेड यांनी सांगितले.
---Advertisement---
---Advertisement---
केशरी आणि पिवळे शिधापत्रक धारकांची उत्पन्न मर्यादा वाढवा-विक्रम छाजेड
---Advertisement---
- Advertisement -