Shirur Loksabha : शिरूर लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सुरुवातीच्या तासांमध्ये डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) हे मोठ्या मतांच्या फरकाने पुढे असल्याचे बघायला मिळत आहे. तर राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adharao Patil) हे पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.
10 वाजून 45 मिनिटांच्या आकडेवारीनुसार, डॉ. अमोल कोल्हे यांना आता पर्यंत 71 हजार 284 मते आहे असून ते 9 हजार 323 मतांनी आघाडीवर आहेत. तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना 6 हजार 1961 मते आहेत. आढळराव पाटील हे सध्या पिछाडीवर बघायला मिळत आहे.
डॉ. कोल्हे यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला होता, ज्यामुळे त्यांना व्यापक जनसमर्थन मिळाले.
Shirur Loksabha
अद्यापही मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे आणि अंतिम निकाल येण्यासाठी काही तास लागण्याची शक्यता आहे. परंतु आत्तापर्यंतच्या निकालांनुसार, डॉ. कोल्हे यांची आघाडीवर आहेत. शिरूर मतदारसंघातील निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर झाल्यावरच येथील राजकीय चित्र स्पष्ट होईल.
हेही वाचा :
ब्रेकिंग : वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुसंडी, 23 हजार मतांनी आघाडीवर
सर्वात मोठी बातमी : वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर
मोठी बातमी : लोकसभेची मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण
मोठी बातमी : देशभरात मतमोजणी सुरू, पहा कोण आघाडीवर !