Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

महात्मा फुलेनगर मध्ये सुवासिनींकडून वटवृक्षाची पूजा करत वटपौर्णिमा साजरी

चिखली : पती-पत्नीचे नाते सात जन्म टिकावे यासाठी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेला सुवासिनींनी वडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले. यानिमित्त चिखली येथील महात्मा फुलेनगर मधील श्री गणेश मंदिराच्या प्रांगणात मोठ्या वटवृक्षाखाली सुहासिनींची गर्दी झाली होती.आख्यायिकेनुसार सत्यवान आणि सावित्री या दाम्पत्याच्या आयुष्यात आलेला एक दिवस म्हणून वटपौर्णिमा आधुनिक युगातही तितक्याच पारंपरिक पद्धतीने साजरा केली जात आहे.

---Advertisement---



हिंदू धर्मातील सण, प्रथा, परंपरा या निसर्गाच्या संस्कृतीशी जोडल्या गेल्या आहेत. जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी मनोभावे सौभाग्यवतींनी पूजा केली. सौभाग्याचे लेणं लेवून मिळेल तिथे वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी पोहोचल्या. परिसरात राहणाऱ्या सुवासिनींनी बाजारातून वडाची फांदी आणून घरीच किंवा अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये, मोकळ्या पटांगणात पूजा न करता परंपरेनुसार वडाच्या झाडाला सुवासिनींनी सात फेरे मारीत धागा बांधला. त्यानंतर तिथे उपस्थित ब्राह्मणांना दान-दक्षिणा देत इतर सुवासिनींनी सौभाग्याचं लेणं हळद-कुंकू लावून, आंब्यांचे वाण देऊन ओट्या भरल्या.



वटपौर्णिमेनिमित्त महिलांकडून एकमेकींना शुभेच्छाही दिल्या जात होत्या. सिद्धार्थ गौतम बुद्ध उद्यानातील भल्यामोठ्या डेरेदार वटवृक्षांची पूजा करण्यासाठी महिला वर्गाची झुंबड उडाली होती. त्या ठिकाणी उत्सवाचे रूप आले होते. मंदिराच्या ठिकाणी केळी, सफरचंद, आंबा, जांभूळ आदी वटपौर्णिमेच्या पूजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत पतीसह महिलांची गर्दी होती. परिसरात दुपारपर्यंत वडाची पूजा आटोपल्यानंतर घराघरात जाऊन वाण देण्यासाठी महिलांची धावपळ सुरू होती. वटपौर्णिमेच्या दिवशी चोरीचे प्रमाण अधिक असते त्यामुळे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे कार्यकर्ते महिला भगिनींच्या सुरक्षेसाठी तैनात होते.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles