मुंबई : फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेसाठी प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ही माहिती दिली असून, विद्यार्थ्यांना त्यांची प्रवेशपत्रे www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील. (HSC admit card)
प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची तारीख (HSC admit card) :
शुक्रवार, दि. १० जानेवारी २०२५ पासून ‘ऍडमिट कार्ड’ या लिंकच्या माध्यमातून प्रवेशपत्रे डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध असेल, असे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी कळवले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, आणि पालक यांना प्रवेशपत्रे डाऊनलोड करण्याची सूचना देण्यात आली आहे.
तांत्रिक अडचणीसाठी मदतीचे आवाहन :
प्रवेशपत्र डाऊनलोड करताना काही तांत्रिक अडचण आल्यास संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी आपापल्या विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.
विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या प्रवेशपत्राच्या प्रती काळजीपूर्वक तपासाव्यात आणि त्यावर नमूद असलेल्या सर्व माहितीत कोणत्याही त्रुटी असल्यास तातडीने शाळा किंवा महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळवावे.
हे ही वाचा :
वडीलांनी मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या, वडिलांनीही संपवलं जीवन
‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…
केरळ मंदिर महोत्सवात हत्तीने माणसाला उचलून हवेत फेकले, भीषण व्हिडिओ
तिरुपती बालाजी मंदिरात भगदड: ६ भाविकांचा मृत्यू
पीएम आवास योजना ते पीएम किसान पर्यंत, बजेटमध्ये या सरकारी योजनांना मिळू शकतो बूस्ट