Thursday, April 17, 2025
---Advertisement---
---Advertisement---

एकनाथ शिंदे यांचे नवे ट्वीट मविआच्या अजगराच्या विळख्यातून…

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड पुकारल्याने राज्यातील अनेक ठिकाणी शिवसैनिकांकडून आंदोलने केली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांची कार्यालयावर फोडली जात आहे, अशात आता एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत शिवसैनिकांना आवाहन केले आहे.

---Advertisement---

एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, महाविकास आघाडीचा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित असल्याचे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले आहे. तसेच त्यांनी पुढे मी शिवसैनिक असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, पालघर आणि ठाणे व अंबरनाथमध्ये शिंदेंच्या समर्थकांनी देखील शक्तिप्रदर्शन केले. तर शिवसैनिकांकडून पुणे, उल्हासनगर, ठाणे, औंरंगाबाद अशा अनेक ठिकाणी कार्यालये फोडण्यात आले. यामुळे दिवसभर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले दिसून आले

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles