Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ,पुणे यांनी केला मानव अधिकार दिन साजरा

PCMC:सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ,पुणे यांनी केला मानव अधिकार दिन साजरा

पिंपरी चिंचवड:सामाजिक कल्याण एवं मानव सरंक्षण संघ,पुणे या human Rights संस्थेने रविवार दिनांक १० डिसेंबर रोजी चिखली प्राधिकरण,चिंचवड येथे जागतिक मानव हक्क दिनाचे औचित्य साधून मानव अधिकार जण जागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला.
समाजामध्ये वावरताना प्रत्येक माणसाला अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यातच सर्वांना मानव हक्क कायद्याची माहिती नसल्याने माणसांची पिळवणूक केली जाते म्हणून मानव अधिकार विषयी जण जागृती करून होणाऱ्या पिळवणुकीला खपवून न घेता सामना करावा यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन हे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी चिंचवड येथे कार्यालय फलकाचे अनावरण करून केले व मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यातून मानवी हक्कांचे प्रबोधन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शिवाजी गुंजाळ,भगवान वायकर,प्रभाकर घोलप,आबासाहेब आहेर, गौरव मांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ ही संस्था नेहमीच मानवाच्या हक्कासाठी आणि अन्यायाविरुद्ध देशपातळीवर काम करत असते व आम्हाला आमच्या संस्थेचा अभिमान आहे असे संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेशजी कुंभारे यांनी सांगितले.
पुणे टीम च्या अशा या कामगिरीसाठी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशजी कुंभारे,राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार आणि पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी किशोर थोरात यांचे अभिनंदन केले व पुढील कामगिरीसाठी संस्था आपल्या पाठीशी असल्याचा विश्वासही व्यक्त केला.
समाजाच्या हितासाठी जास्तीत जास्त लोकांनी या संस्थेत सहभागी होऊन आपले योगदान दिले तर नक्कीच सर्व नागरिक सुरक्षित राहतील व होणारी फसवणूक थांबेल असेही किशोर थोरात यांनी सांगितले.
संस्थेच्या कार्यात आपण सहभागी होण्यासाठी किशोर थोरात यांचेशी संपर्क करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय