आदिवासी ठाकर कुटुंबियांचे मोठे नुकसान
आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील चऱ्होली खुर्द, पद्मावती रस्त्यावरील पाझर तलाव, ठाकर वस्ती ( ता. खेड ) परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने ठाकर कुटुंबियांच्या घराचे छप्पर उडाल्याने घरातील दोन महिला आणि शेजारील एक युवक जखमी झाले. परिसरातील विविध ठिकाणी झाडे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चऱ्होली खुर्द मध्ये घराचे छप्पर उडाल्याने तीन जखमी पैकी एकास मुका मारा लागला. एका मुळावर डॉ. कुरे हॉस्पिटल मध्ये उपचार करून घरी सोडण्यात आले. तर एक महिला गंबीर जखमी झाली असून तिच्यावर कमलेश हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु असल्याचे डॉ. भूषण यांनी सांगितले. सद्या रुग्नाची प्रकृती स्थिर असून अति दक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या घटनेतील जखमी रेखा ठाकर यांचेवर कमलेश हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. हिराबाई ठाकर यांचेवर कुरे हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात आले आहेत. त्यांच्या डोक्याला मार लागला असून टाके घालण्यात आले आहेत. यात राहुल ठाकर यांस मुक्का मार लागला.
वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने शांताबाई पांडूरंग ठाकर यांचे घरावरील पत्रे उडाले. यामुळे ठाकर कुटुंबीयांचा संसार उघड्यावर आला आहे. पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने घरातील सर्व सामान भिजून घरासह घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. ठाकर कुटुंबियांना यामुळे मोठे नसून झाले असून त्याना उघड्यावर राहण्याची वेळी आली असून रुग्णालयीन खर्च आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरातील नागरिक, पदाधिकारी आणि राज्य शासनाने त्यांना तात्काळ मदत करावी असे आवाहन यशवंत संघर्ष सेनेचे राज्य अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे, नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर यांनी केले आहे. कमलेश हॉस्पिटल मध्ये जाऊन यावेळी रुग्णालयात ठाकर परिवाराची भेट घेऊन धीर देण्यात आला.
या प्रसंगी आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, मंडूबाबा पालवे, माऊलींचे पालखी सोहळ्याचे मानकरी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. आळंदी मंडलाधिकारी स्मिता जोशी यांना तात्काळ ठाकर कुटुंबियांचे घराचा पंचनामा करून शासकीय मदत आणि नुकसान भरपाई देण्यासाठी आळंदी जनहित फाउंडेशनचे वतीने संपर्क साधून आवाहन करण्यात आले. ठाकर कुटुंबियांचे घराचा पंचनामा करण्यात आला असून शासन स्तरावरून मदत मिळावी यासाठी आळंदी जनहित फाउंडेशन पाठपुरावा करीत आहे. मात्र मोठे नुकसान झाल्याने समाजातील दानशूर व्यक्ती , संस्था यांनी देखील पुढे येऊन ठाकर कुटुंबियांना मदत करावी असे आवाहन यशवंत संघर्ष सेनेचे राज्य अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे यांनी केले आहे.