Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बाातमी : महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ (State Curriculum Framework 2024) अंतर्गत पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य (Hindi Compulsory) करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, राज्यातील सर्व शाळांमध्ये हिंदीचे अध्यापन सक्तीचे असेल. हा निर्णय मराठी भाषेच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारा असल्याचा आरोप करत राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

---Advertisement---

महाराष्ट्र सरकारने २०२४ मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नवीन शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला. या आराखड्यात भाषा शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात तीन भाषा सूत्राचा (Three Language Formula) समावेश आहे, ज्यामध्ये स्थानिक भाषा, हिंदी आणि इंग्रजी यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात मराठी ही स्थानिक भाषा आणि इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आधीपासूनच शिकवली जाते. आता तृतीय भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा – मोठी बातमी : मोदी सरकारला मोठा धक्का ; नव्या वक्फ कायद्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती)

हा निर्णय पहिलीपासून लागू करण्यात येणार असून, यामुळे विद्यार्थ्यांना लहान वयातच हिंदी भाषेचे शिक्षण मिळेल, असा सरकारचा दावा आहे. मात्र, या निर्णयाला मराठी भाषिक समुदाय आणि राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध होत आहे. यापूर्वीही तमिळनाडूसारख्या राज्यांमध्ये हिंदी अनिवार्य करण्याला विरोध झाला होता, आणि आता महाराष्ट्रातही असाच वाद निर्माण झाला आहे. (हेही वाचा – धक्कादायक : दोन मित्रांची एकाच झाडाच्या फांदीला गळफास घेत आत्महत्या)

---Advertisement---

काय म्हणाले राज ठाकरे | Hindi Compulsory

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. त्यांनी म्हटले, “राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही.  (हेही वाचा – महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून केले करोडपती)

केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.” ‘आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर संघर्ष अटळ आहे,’ असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. (हेही वाचा – लाडक्या बहीणींना धक्का ; आता 1500 नव्हे तर फक्त 500 रुपयेच मिळणार)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles