Tuesday, April 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Heavy rain : नागपूरसह विदर्भात अतिवृष्टी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिस्थितीचा आढावा (video)

नागपूर : नागपूर शहर आणि जिल्ह्यात आज दि. 20 जुलै रोजी सकाळी मुसळधार पावसामुळे वाहतूक व जनजीवन विस्कळित झाले. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने सखल भागातील तुंबलेल्या पाण्याचा निचरा झाल्याने जनजीवन व वाहतूक पूर्वपदावर आली. (Heavy rain)

---Advertisement---

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा जोर लक्षात घेता तत्काळ विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी व जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आढावा घेतला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळेतील मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली. (Heavy rain)

नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. (Heavy rain)

नागपूर आणि गडचिरोलीला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गडचिरोली, नागपूर जिल्ह्यात शाळा महाविद्यालयाना सुट्टी देण्यात आली आहे. सलग ६ तास २१७ मिमी मुसळधार पाऊस पडल्याने शनिवारी झालेल्या नागपुरातील पावसाच्या परिस्थिती नंतर जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी आज नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेजेस ना सुट्टी जाहीर केली. (Heavy rain)

नागपूर ग्रामीण भागात पावसाचे पाणी वस्तीमध्ये घुसल्याने अनेक ठिकाणी लोक अडकून पडले होते. कामठी तालुक्यामध्ये खेडी येथे 15 व्यक्ती, पावनगाव येथे 12 व्यक्ती, महलगाव येथे 10 व्यक्ती हे त्यांच्या राहत्या घराच्या परिसराला पाण्याने वेढा पडल्यामुळे अडकले होते.

---Advertisement---

त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. हिंगणा तालुक्यात वाघधरा येथे 5 व्यक्ती वेणा नदीच्या पुरात अडकली होती. एसडीआरएफ मार्फत या व्यक्तींना सुखरुप स्थळी हलविण्यात आले. कुही तालुक्यात 21 घरांची, भिवापूरमध्ये 16 घरांची तर मौदामध्ये 10 घरांची पडझड झाली. (Heavy rain)

याठिकाणी महसूल विभागाची टीम प्रत्यक्ष स्थळावर जाऊन आली असून पंचनामे व इतर प्रक्रिया पूर्ण करीत आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles